ladki bahin yojana new update :- महाराष्ट्रातील सरकारने गरीब व गरजू महिलांसाठी लाडकी बहीण योजना राबवली आहे. या योजनेच्या माध्यमातून राज्यातील गरीब व गरजू महिलांना प्रति महिना 1 हजार 500 रुपये इतकी रक्कम त्यांच्या खात्यामध्ये जमा केली जात आहे. परंतु आता सरकारच्या या महत्त्वाकांशी लाडकी बहिण योजनेबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे अजित पवार यांनी पष्ट केले की या योजनेअंतर्गत अनेक महिलांना आता लाभ दिला जाणार नाही.
हे पण वाचा :- लाडक्या बहिणींना लवकरच मिळणार एप्रिल महिन्याचे 1500 हजार रुपये! आली मोठी माहिती समोर
महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण योजना 2024 जून महिन्यामध्ये सुरू केली होती. या योजनेच्या माध्यमातून ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी आहे अशा कुटुंबातील महिलांना प्रति महिना म्हणून 1500 रुपये रक्कम दिली जाते. त्याचबरोबर सरकारने निवडणुकीच्या प्रचारा काळात असे आश्वासन दिले होते की आम्ही पुन्हा सरकारमध्ये आल्यानंतर लाडकी बहीण योजनेची रक्कम 2100 रुपये करू. परंतु राज्यांमध्ये सरकार आल्यानंतरही अजून देखील लाडकी बहीण योजनेच्या रकमेमध्ये वाढ करण्यात आली नाही.
हे पण वाचा :- या महिलांना मिळणार डबल बोनस? एप्रिल आणि मे महिन्याचे 3 हजार रुपये होणार जमा
त्याचबरोबर विरोधकांनी सरकारवर आरोप केले की लाडकी बहीण योजना सुरू केल्यामुळे राज्याच्या तिजोरीवर चांगला भर पडला आहे. आणि सरकार लवकरच ही योजना थांबू शकते तसेच इतर योजनेचे पैसे देखील योजनेत कडे वळविण्यात आले आहे या आरोपावर उत्तर देताना राज्याची उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी यावर मोठे विधान केले आहे.
काय म्हणाले अजित पवार ?
अजित पवार यांनी स्पष्टीकरण देताना म्हटले की सरकारने सर्व घटकांना न्याय देण्यासाठी अनेक प्रयत्न केले आहे. कुठल्याही प्रकारे महाराष्ट्राचा विकास हमला जाणार नाही व लाडकी बहीण योजनेबाबत विरोधाकडून चुकीच्या टीका होत आहे. अजित पवार म्हटले की ही योजना कोणत्याही प्रकारे थांबवली जाणार नाही त्यामुळे लाडक्या वहिनींना चिंता घेण्याची खूप गरज नाही.
हे पण वाचा :-या नागरिकांना मिळणार नाही आयुष्मान कार्ड! तुमचे नाव तर या यादीमध्ये नाहीना मान्यथा मिळणार नाही लाभ
या महिलांना मिळणार नाही योजनेचा लाभ ;-
यानंतर अजित पवार बोलतानी स्पष्ट केले की, ही योजना सरकारने महिलांना दिलेली एक भेट आहे, ही भेट सरकारने भाऊबीज आणि रक्षाबंधन साठी दिली आहे त्यामुळे ही योजना कायमस्वरूपी राहणार आहे. अजित पवार असे देखील म्हटले की ज्या महिलांना आधीपासून इतर कोणते योजनेचा लाभ मिळत आहे अशा लाडक्या बहिणींना आता लाडकी बहीण योजनेचा लाभ दिला जाणार नाही त्यामुळे प्रत्येक अर्जदारांची परिस्थिती तपासली जाणार आहे.