ration card maharashtra :- सरकार अनेक वेळा नवीन नियम लागू करीत असतात, काही वेळा एखादी योजनांवर तर काही वेळा गॅस, बँक इतर ठिकाणी आज आम्ही तुम्हाला अशाच एक नवीन निर्णयाबद्दल माहिती देणार आहोत. सरकारच्या वतीने गरीब नागरिकांसाठी रेशन कार्ड योजना राबवली जात आहे या योजनेअंतर्गत गरीब नागरिकांना मोफत स्वस्त धान्य दिले जात आहे.
हे पण वाचा :- या नागरिकांचे होणार रेशन कार्ड बंद? राज्य सरकारने सुरू केली नवीन मोहीम
सरकारने अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागामार्फत एक एप्रिल 2025 पासून राज्यामध्ये अपात्र शिधापत्रिकाधारक शोधण्यासाठी एक विशेष मोहीम राबवली आहे. ही मोहीम 21 मे पर्यंत चालवण्यात येणार आहे या मोहिमे अंतर्गत जे लाभार्थी या नियमाच्या बाहेर असणार आहेत अशा लाभार्थ्यांचे रेशन कार्ड बंद करण्यात येणार आहे. ज्यामध्ये लाभार्थ्याचे उत्पन्न जास्त असेल तर व जी लाभातील दिलेल्या पत्त्यावर राहत नाही किंवा लोकांचा मृत्यू झाला आहे अशा सर्व नागरिकांची आता कठोर चौकशी होणार आहे. ration card maharashtra
लवकर हे काम करा :-
या मोहिमे अंतर्गत प्रत्येक शिधापत्रिका धारकाला एक लेखी स्वरूपाचा फॉर्म आपल्या स्वस्त धान्य दुकानांमध्ये देवा लागणार आहे. हा फॉर्म तुम्हाला तुमच्या स्वस्त धान्य दुकानांमध्येच मिळणार आहे लाभार्थ्यांनी या फॉर्ममध्ये आपली आवश्यक खरी माहिती भरून द्यायची आहे व संबंधित आवश्यक कागदपत्रे सादर करायचे आहे.
हे पण वाचा :- सोने खरेदीदारांसाठी मोठी संधी! दरात झाली मोठी घसरण, पहा आजचे नवीन दर
अर्जाची या प्रकारे होणार छाननी :-
तुम्हाला सर्वप्रथम स्वस्त धान्य दुकानांमध्ये एक अर्ज भरायचा आहे, जर तुमचे वार्षिक उत्पन्न एक लाखापेक्षा जास्त आढळून आल्यास संबंधित लाभार्थ्याची शिधापत्रिका की अन्नसुरक्षा किंवा अंतोदय योजनेमधून वगळून शुभ्र किंवा केशरी श्रेणी मध्ये स्थलांतरित करण्यात येणार आहे. या मुळे आता ज्या कुटुंबांना प्रत्यक्ष करत आहे त्याच कुटुंबांना आता लाभ दिला जाणार आहे.
हे पण वाचा :- या नागरिकांचे होणार रेशन कार्ड बंद? राज्य सरकारने सुरू केली नवीन मोहीम
या मोहिमे अंतर्गत जर बोगस किंवा अपात्र लाभार्थी आढळले तर कारवाई होणार आहे. यानंतर परदेशी लाभार्थी व एकूण अधिक शिधापत्रिका वापरण्यावरून देखील कारवाई होणार आहे. जर तुम्ही पात्र नसताना देखील या योजनेचा लाभ घेतला असेल तर तुमच्यावर कारवाई होणार असल्याची माहिती समोर आली आहे. या मोहिमे अंतर्गत ही सर्व माहिती 15 जून पर्यंत सरकारकडे सादर करायची आहे व त्यामुळे सर्व लाभार्थ्यांनी वेळेमध्ये जाऊन आपली माहिती आपल्या दुकानदाराला द्यायची आहे.
3 thoughts on “बोगस शिधापत्रिका कार्ड धारकांवर होणार कारवाई! सरकारने सुरू केली नवीन मोहीम ”